शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: काळविटाची शिकार; शिंगांसह चौघांना अटक, वनविभागाने रोखली तस्करी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:50 IST

पाटणच्या सेवानिवृत्त पोलिसाचा हात !

कऱ्हाड : काळविटाची शिकार करून त्याच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. वारुंजी फाटा-कऱ्हाड येथे बुधवारी रात्री उशिरा वनविभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.रत्नाकर हनुमंत गायकवाड (वय ४२, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), अमर भगवान खबाले (वय ३५), इलाई सय्यद शेख (वय ५०) व विशाल संभाजी शिंदे (वय ३१, तिघेही रा. कऱ्हाड) अशी वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड जवळील वारुंजी फाटा येथे एका हॉटेलसमोर दोघेजण संशयास्पदरीत्या फिरत असून त्यांच्याकडे वन्यप्राण्यांची शिंगे असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, आर.एस. नलवडे, सागर कुंभार, आनंदा जगताप, बाबूराव कदम, सचिन खंडागळे, शीतल पाटील यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री उशिरा सापळा रचला.वनविभागाचे पथक वारुंजी फाटा येथील हॉटेलसमोर पोहोचले. त्यावेळी त्यांना रत्नाकर गायकवाड आणि अमर खबाले हे संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ काळविटाची चार शिंगे आढळून आली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता या तस्करीत आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने इलाई शेख आणि विशाल शिंदे या दोघांना ताब्यात घेतले.संबंधित चौघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून काळविटाची चार शिंगे आणि चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पाटणच्या सेवानिवृत्त पोलिसाचा हात !वनविभागाकडून काळविटाच्या शिकारीबाबत आरोपींकडे कसून चौकशी केली जात आहे. या चार आरोपींनी ही शिंगे पाटण येथील एका सेवानिवृत्त रेल्वे पोलिसांकडून घेतली असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे वनाधिकारी त्या सेवानिवृत्त पोलिसाकडे तपास करणार आहेत. रेल्वे पोलिसाने ती शिंगे कोठून आणली, काळविटाची शिकार कोठे आणि कुणी केली, त्यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याबाबतचा तपास वनविभागाकडून केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडforest departmentवनविभाग