भाजपाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार!

By Admin | Updated: February 20, 2017 03:44 IST2017-02-20T03:44:55+5:302017-02-20T03:44:55+5:30

पुणे-बंगळुरू महामार्गालगत गाडीतून उतरुन थोडावेळ थांबलेले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे यांच्यावर

BJP's Satara district secretary general firing! | भाजपाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार!

भाजपाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार!

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गालगत गाडीतून उतरुन थोडावेळ थांबलेले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला. मात्र, ते बालंबाल बचावले. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बोरगावजवळ ही घटना घडली.
नंदकुमार ननावरे हे शनिवारी दुपारी कारमधून कऱ्हाडला गेले होते. रात्री ते परत फलटणला निघाले होते. बोरगावजवळील उड्डाणपुलाच्या पुढील बाजूस आल्यानंतर त्यांनी कार थोड्यावेळ थांबविली. कारच्या पाठीमागील बाजूस उभे असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता दुचाकीवर दोन युवक होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या युवकाच्या हातात पिस्तूल होते. काही क्षणातच दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले.
ननावरे यांच्या कारमधील सीटवर गोळी लागल्याच्या खुणा आहेत. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या ननावरे यांनी तत्काळ बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली; परंतु हल्लेखोर सापडले नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's Satara district secretary general firing!