भाजपच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:15+5:302021-07-21T04:26:15+5:30
म्हसवड : भाजपच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक सोमवारी मुंबई दादर येथे पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे ...

भाजपच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक
म्हसवड : भाजपच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक सोमवारी मुंबई दादर येथे पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने त्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून ओबीसी नेत्यांनाच उमेदवारी देईल, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केली.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आता त्या जागांवर निवडणूक होईल. तेव्हा खुल्या गटातील उमेदवाराऐवजी ओबीसींनाच उमेदवारी दिली जाईल. एखादा उमेदवार निवडून आला नाही तरी चालेल; पण भाजप माघार घेणार नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे फडणवीस यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
बैठकीस माजी खासदार हंसराज अहिर, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री संजय कुंटे, प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष करण सुनील पोरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, कार्यकारिणी सदस्य, सचिव उपस्थित होते.