कऱ्हाडला भाजपचे महावितरणविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:27+5:302021-02-06T05:14:27+5:30
कऱ्हाड येथे दत्त चौकातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर सकाळी दहाच्यासुमारास भाजपचे कार्यकर्ते जमा झाले. वीज वितरणच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी झाल्याने सर्वांचे ...

कऱ्हाडला भाजपचे महावितरणविरोधात आंदोलन
कऱ्हाड येथे दत्त चौकातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर सकाळी दहाच्यासुमारास भाजपचे कार्यकर्ते जमा झाले. वीज वितरणच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. ७५ लाख वीजग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून राज्यातील सुमारे चार कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचा डाव होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला .आपल्या मागण्यांचे निवेदन ही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दिले.
यावेळी कऱ्हाड शहर भाजपचे अध्यक्ष एकनाथ बागडी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, प्रशांत कुलकर्णी, राहुल भिसे, प्रमोद शिंदे, सीमा घार्गे, नम्रता कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------
फोटो : pramod 05-2
फोटो ओळ : कऱ्हाड येथे महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करताना भाजपचे पदाधिकारी.