सभासद नोंदणीचे उद्दिष्ट भाजप पूर्ण करेल
By Admin | Updated: November 25, 2014 23:58 IST2014-11-25T22:04:42+5:302014-11-25T23:58:35+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कऱ्हाडात विश्वास ; सभासद नोंदणीस प्रारंभ

सभासद नोंदणीचे उद्दिष्ट भाजप पूर्ण करेल
कऱ्हाड : राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे़ आता अच्छे दिन आल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे़ त्यामुळे सातारा जिल्हा भाजप सभासद नोंदणिचे ३ लाखाचे उद्दीष्ट पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला़
मुख्यमंत्री फडणवीस आज कऱ्हाड दौऱ्यावर होते़ त्यावेळी त्यांच्या हस्ते कऱ्हाड तालुका भाजपची सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला़ यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड़ भरत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सभासद नोंदणी शुभारंभ झाला त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली़ त्यावेळी कऱ्हाड तालुक्यात ५० हजार सभासद नोंदणीचे उद्दीष्ट असल्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र घारे व अॅड़ महादेव साळुंखे यांनी सांगितले़
यावेळी श्री पेंढारकर, केदार डोईफोडे, नितीन वास्के, प्रशांत कुलकर्णी, दिनेश लद्दड, कांतीलाल जैन, लक्ष्मीकांत मिणियार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी एक हजार सभासद
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्याा मार्गावर कऱ्हाड तालुका भाजपने सभासद नोंदणी कक्ष सुरु केले आहे़ या कक्षात आज पहिल्या दिवशीच एक हजारावर लोकांनी भाजपचे सभसदत्व स्विकारले आहे़