शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे 

By प्रमोद सुकरे | Updated: November 13, 2022 11:32 IST

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कराड : धनगर समाजाला वैभवशाली इतिहास आहे. संघटित समाजच संघर्ष करू शकतो हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर या समाजाने केवळ पारंपारिक व्यवसायात न अडकता उच्चशिक्षित पिढी तयार केली पाहिजे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी भाजप त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून    बावनकुळे बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर ,सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ.अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. सन २०१९ ला अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर लढले. त्यावेळी त्यांना भाजपने शब्द दिला होता तो भाजपने पाळला. त्यांना आमदार केले. गत अडीच वर्षात पडळकरांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडले होते. त्याचप्रमाणे कराड दक्षिणमधील विरोधकांना तुम्ही संघशक्तीने सळो की पळो करून लावा. भाजप तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला आहे. चाळीस-पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही धनगर समाजाचे प्रश्न आहे तसेच राहिले आहेत. त्यांचा फक्त मतांसाठी वापर करून घेण्यात आला. यापुढे तसा वापर होऊ देऊ नका. भाजपच तुम्हाला न्याय देऊ शकतो हे लक्षात घ्या .

डॉ. अतुल भोसले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले .अन आजही सत्ता आल्याने ते घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण मूळच्या स्थानिक लोकांनी राजकारण जरा बाजूला ठेवावे. काम करणाऱ्या प्रत्येकाला इथे संधी मिळेल पण संधी मिळण्यासाठी काम करू नका. सत्तेची, पदाची अपेक्षा न ठेवता काम करा. असा कानमंत्रही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ते तर बेईमानी सरकार!आता राज्यात आपले सरकार आले आहे. पण अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार हे तर बेईमानीने सत्तेवर आलेले सरकार होते. अशी टीका डॉ.अतुल भोसले यांनी भाषणात केली. पण बेईमानी फार काळ टिकत नाही. आता आलेले सरकार धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कराड दक्षिणचा मोठा वाटा असेलआगामी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल. त्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असेल, असे डॉ अतुल भोसले यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा