शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:16 IST

विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर,निष्ठावंतांची गोची युतीची पावले फुटीच्या दिशेने; मावळ्यांवर जिंदाबाद म्हणण्याची वेळ

सागर गुजर सातारा : विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वाई-खंडाळा-महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड  उत्तर, कऱ्हाड दक्षिण, कोरेगाव या पाच मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे आमदार मकरंद पाटील, सत्यजित पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याने या मंडळींनी कामाला सुरुवात केलेली आहे.दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना या पक्षांतर्फेही काहींनी तयारी केलेली आहे. मात्र, त्यांच्या तयारीवर विरजण टाकण्याचे काम त्यांच्याच नेत्यांकडून केले जात असल्याचे दिसते. दोन्ही पक्षांच्या युतीचे घोडे अजूनही जागा वाटपात अडकून पडलेले आहे.

शिवसेनेला युती हवी असली तरी २८८ पैकी निम्म्या म्हणजे १४४ जागा हव्या आहेत, त्याउलट एवढ्या जागा देणे अशक्य असल्याची माहिती भाजपचे नेते वारंवार देत आहेत. शिवसेनेच्या ६३ व भाजपच्या १२२ विद्यमान जागा जैसे थे ठेवून उर्वरित १०३ जागांबाबत वाटपाचा विचार भाजपने सुरू केलेला आहे.दुसऱ्या बाजूला आयातांची मेगा भरती दोन्ही पक्षांनी सुरूच ठेवल्याने युतीतर्फे इच्छुक असणाऱ्या संभावित उमेदवारांमध्ये संभ्रमावस्थेचे वातावरण आहे. या परिस्थितीत दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणी युती फोडून वेगवेगळे लढण्याचीही शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे दीपक पवार, अमित कदम यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता; परंतु राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना सध्याच्या घडीला तरी युतीमधून दुसरा स्पर्धक नसल्याचे चित्र आहे.वाई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याशी पारंपरिक पद्धतीने होणार आहे. माण-खटाव मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची भाजपमध्ये जाण्याची जोरदार तयारी सुरू आहे, तर त्यांना भाजपमधूनच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा विरोध आहे. त्यातूनही आ. गोरे यांनाच भाजपने उमेदवारी दिली तर या ठिकाणी मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या शेखर गोरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आहे.फलटणमधून भाजपतर्फे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे समर्थक दिगंबर आगवणे यांनी तयारी सुरू केली असली तरी त्यांचे विरोधक असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संपूर्ण गटाने भाजपची दारे ठोठावल्याने आगवणे यांची गोची झाली आहे. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनीही फलटण मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली असल्याने भाजपमधून तिघे इच्छुक होण्याची शक्यता आहे.कऱ्हाड उत्तरमधून भाजपतर्फे जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वीपासूनच तयारी सुरू केलेली आहे. कऱ्हाड दक्षिणमधूनही विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, कोरेगावातून महेश शिंदे यांना भाजपची उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

या ठिकाणी जर भाजपने इनकमिंग केले तर आणखी क्लिस्ट परिस्थिती निर्माण होणार आहे. रोजच्या रोज नव्या घडत आहेत. राष्ट्रवादीत निष्ठावंत म्हणवून घेणारे कुठल्याही क्षणी रंग बदलत आहेत.सतरंज्या उचलणाऱ्यांना दोन्ही काँग्रेसमध्ये महत्त्व...सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, विविध कार्यकारी सहकारी संस्था, बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून कधी कोण निघून जाईल, याचा भरवसा राहिला नसल्याने वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे महत्त्व आल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला सतरंज्या उचलायलाही कार्यकर्ते उरले नसल्याची विदारक परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण