भरमसाट वीज बिलाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST2021-02-10T04:38:53+5:302021-02-10T04:38:53+5:30

वाई : लॉकडाऊन काळात व्यवसाय, कार्यालये बंद होती. सरासरी बिले येऊनही अतिरिक्त युनिट टाकल्यामुळे जादाच्या दराने वाढीव बिले आली ...

BJP protests against huge electricity bill | भरमसाट वीज बिलाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

भरमसाट वीज बिलाच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

वाई : लॉकडाऊन काळात व्यवसाय, कार्यालये बंद होती. सरासरी बिले येऊनही अतिरिक्त युनिट टाकल्यामुळे जादाच्या दराने वाढीव बिले आली आहेत. यामुळे व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. याच्याविरोधात वाई भाजपच्यावतीने वाईच्या महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांना निवेदन दिले. महावितरणच्या कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र सहकार आघाडी सहसंयोजक सी. व्ही. काळे म्हणाले, कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच वाढीव वीज बिले आल्यामुळे ही एकरकमी रक्‍कम भरण्याची समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाली आहे. सरासरी भरलेले आणि आता अनेक महिन्यांचे एकत्रित बिल यामुळे प्रचंड आर्थिक भार ग्राहकांवर पडला आहे.

तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ म्हणाले, घरगुती ग्राहकांकडून वीजबिले कमी करावीत याविषयी जोरदार मागणी होत आहे. त्यावर कुठलाही निर्णय न घेता सरसकट बिले पाठविण्यात आली आहेत. त्यातच सद्यपरिस्थितीत ज्या ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत, त्यांच्या घरातील वीज तोडली जाईल, अशा पद्धतीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे संपूर्णपणे अन्यायकारक आहे. सरकार तसेच महावितरण स्वतःची मनमानी करून जर कारभार करणार असेल, तर भारतीय जनता पार्टीला जनतेसाठी याहीपेक्षा तीव्र आंदोलन करावे लागेल.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगतात, वीज बिले कमी करण्याची मागणी केली. यावेळी वाई शहराध्यक्ष राकेश फुले, जिल्हा चिटणीस यशवंतराव लेले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य काशिनाथ शेलार, शहर सरचिटणीस देवानंद शेलार, सरचिटणीस सचिन गांधी, सरचिटणीस तनुजा इनामदार, उपाध्यक्ष शस्मिता जैन, उपाध्यक्ष नरेंद्र महाजन, विजयाताई भोसले, भाजपा माजी शहराध्यक्ष अजित वनारसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा शुभदा नागपूरकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तेजस जमदाडे, युवा मोर्चा कार्याध्यक्ष अथर्व पाटील, शहर चिटणीस अजय कामठे, चिटणीस उत्तम जायगुडे, चिटणीस प्रसाद चरेगावकर, वाहतूक आघाडी अध्यक्ष गुलाब डोंगरे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष अरविंद बोपर्डीकर, नगरसेविका वासंती ढेकाणे, नगरसेविका रूपाली वनारसे, युवा मोर्चा सरचिटणीस संजय डोईफोडे, महिला मोर्चा सरचिटणीस मानसी पटवर्धन, भारती कुलकर्णी, स्नेहा थिटे, कार्यकारिणी सदस्य अनिल फुले, आदेश खोलपे, राहुल जमदाडे उपस्थित होते.

फोटो ०९वाई-बीजेपी

वाई येथे वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. (छाया : पांडुरंग भिलारे)

Web Title: BJP protests against huge electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.