भाजपा फलटणतर्फे १००१ वृक्ष लागवडीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST2021-07-24T04:23:22+5:302021-07-24T04:23:22+5:30
मलटण : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण भाजपा युवा मोर्चा व भारतीय ...

भाजपा फलटणतर्फे १००१ वृक्ष लागवडीस प्रारंभ
मलटण : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी फलटण यांच्यातर्फे तालुक्यामध्ये १००१ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा गुरुवारपासून सुरू झाला असून, फलटणमधील मलटण, तांबमाळ, निंभोरे, गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष नितीन जगताप, उपाध्यक्ष नितीन गोडसे उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील तांबवे या गावी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर उपस्थित होते. फलटण शहर व फलटण तालुक्यातील परहर खुर्द, माळेवाडी, कोरेगाव, पवारवाडी, आसू, तिरकवाडी, तांबमळा, कोळकी, शिंदेवाडी, सासवड, निंभोरे, पाडेगाव, चांभारवाडी व इतर गावांमध्येदेखील वृक्षारोपण करण्यात आले.