शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे; सभापती निवडीतही भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ची नीती!

By नितीन काळेल | Updated: March 25, 2026 19:23 IST

राष्ट्रवादी-शिंदेसेना मात करणार? : प्रशासनासह राजकीय पक्षही ‘हाय टेन्शन’मध्ये

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून सत्ता काबीज केली असून, आता चार सभापतींच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. यासाठी चार एप्रिलला मतदान होणार असून, भाजप पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना भाजपवर मात करण्याच्या प्रयत्नात राहणार असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. तरीही या निवडणुकीत प्रशासनासह राजकीय पक्षही ‘हाय टेन्शन’मध्ये राहण्याचीच अधिक शक्यता आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने स्वतंत्र बाणा दाखवला. कोरेगाव तालुक्यात शिंदेसेना आणि फलटणला राष्ट्रवादीसाठी काही जागा सोडल्या. अन्यथा सर्वत्र ताकदीने निवडणूक लढविली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेना समन्वय राखत निवडणुकीला सामोरे गेले. यामध्ये या दोघांनाही चांगले यश मिळाले.

या निवडणुकीत भाजपला २७, राष्ट्रवादी २० आणि शिंदेसेनेला १५ जागा प्राप्त झाल्या. यामध्ये कोणत्याही एका पक्षाला सत्ता स्थापन करणे अवघड होते. कारण बहुमतासाठी ३३ सदस्यांचे पाठबळ लागणार होते. अशावेळी राष्ट्रवादी आणि शिंदेसेना पुन्हा एकत्र आले. त्यांनी सत्तास्थापनेसाठी तयारी केली. तसेच आपले सदस्य अज्ञातस्थळी टूरवर पाठविले. इकडे भाजपला सत्ता हवीच होती. यासाठी जिल्ह्यातील नेतेही आमचाच अध्यक्ष होणार हे सांगत होते.

पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हेजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपकडे बहुमत नव्हते. पण, ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. याला शिंदेसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी साथ दिली. त्यामुळे भाजपच्या ताब्यात सत्ता आली. पण, आता चार सभापतींची निवड होणार आहे. या निवडीच्या वेळीही पुन्हा भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेसेना ठामपणे उभी राहणार आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीवेळचा प्रकार पुन्हा घडणार का ? अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीत प्रशासनाला हाय टेन्शन राहणार आहे. त्याचबरोबर भाजपलाही सभापती पदासाठी पुन्हा जुळणी करावी लागणार आहे. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला पुन्हा चाल खेळावी लागेल. या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तासंघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हात उंचावून मतदानजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती त्याचबरोबर इतर दोन विषय समितींच्या सभापतींची निवडणूक ४ एप्रिलला होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश काढला आहे. या सभापती निवडीत सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजेनंतर आवश्यकता असल्यास मतदान होणार आहे. पण, साताऱ्यात मतदानानेच सभापती निवड होणार आहे. यासाठी सदस्यांना पुन्हा एकदा हात उंचवावे लागणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Zilla Parishad: BJP's 'Operation Lotus' sparks power struggle again.

Web Summary : Satara Zilla Parishad anticipates a renewed power struggle as BJP aims to repeat its 'Operation Lotus' strategy in upcoming committee chairperson elections, challenging the coalition of NCP and Shiv Sena.