शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election: कऱ्हाडमध्ये अनेक ठिकाणी अतुल भोसले समर्थकांचे गटच आमने-सामने, कासारशिरंबेत 'दिलजमाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:36 IST

सरपंच पदासाठी चौरंगी लढत

प्रमोद सुकरेकऱ्हाड : तालुक्यात  ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे समर्थकांचे गटच आमने-सामने आल्याचे चित्र आहे. मात्र कासारशिरंबे येथे त्यांचेच दोन गट यावेळी एकत्रित आले आहेत.त्यामुळे भोसले गटाची ही दिलजमाई  निवडणूकीतील जमेची बाजू मानली जात आहे.ग्रामपंचायतीसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थक कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील व माजी सरपंच बाबुराव यादव यांनी परस्पर विरोधी निवडणूक लढवली होती. मात्र त्याचे परिणाम समोर आले होते. त्यामुळे या दोघांनी यावेळी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणाची दिशा व डावपेच प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या निवडणुकीनुसार बदलत असतात. ग्रामपंचायत ते आमदारकीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये हा फरक प्रकर्षाने जाणवून येतो. आमदारकीसाठी एकत्र असणाऱ्या समर्थकांचा गट ग्रामपंचायतीसाठी एकत्र लढेलचं असं नाही. निवडणुकीच्या त्या त्या स्तरावर ही समीकरणं बदलत असतात.कासारशिरंबे, ता. कराड या गावातील मागील पंचवार्षिक निवडणूक माजी सरपंच बाबुराव यादव यांनी 'एकला चलो रे' करत एकहाती किल्ला लढवला होता. मात्र त्यांना यशाप्रत पोहोचता आले नाही. त्यामुळे विरोधी आघाडीने बाजी मारली होती. पण त्याला भोसलेंच्या एका गटाचा हातभार लागला होता.यंदाच्या निवडणुकीत श्री हनुमान कालिका ग्रामविकास पॅनेलचे माजी सरपंच बाबुराव यादव, कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील, माजी उपसरपंच शंभूराज पाटील हे भाजप नेते  डॉ.अतुल भोसले गटाकडून पँनेल रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात बहुजन रयत पॅनेलकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक दादा पाटील, अँड. उदयसिंह पाटील समर्थक जयवंतराव बोंद्रे, सुदाम बोंद्रे गट तर अविनाश मोहिते समर्थक जयशंकर यादव गट एकत्रित लढत आहेत.भोसले गटातर्फे श्रीकांत यादव तर विरोधी गटाकडून उमेश महाजन यांच्यात थेट सरपंच पदासाठी लढत पाहायला मिळत आहे. सरपंच पदासाठी अन्य दोन अपक्षही रिंगणात आहेत.त्यामुळे कोणाची मते कोण खाणार? नक्की कोण बाजी मारणार ?याबाबत उलट- सुलट चर्चा सुरू आहेत.

 'कडवी झुंज' स्मरणातकासारशिरंबेतील गत पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय गट एकत्रित लढले होते. यांच्या विरोधात माजी सरपंच बाबुराव यादव यांनी एकाकी कडवी झुंज दिली होती. सरपंच पदासाठी सुमारे २ हजार ८०० मतांपैकी १ हजार १६५ मते एकट्या बाबुराव यादव यांनी मिळवली होती. तर १ हजार  ६३५ मते विरोधी गटाला मिळाली होती. बाबुराव यादव यांची ही 'कडवी झुंज' आजही ग्रामस्थ आवर्जून सांगतात. यंदा निवडणुकीसाठी सुमारे ३ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सरपंच पदासाठी चौरंगी लढतसरपंच पदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. भोसले गटातर्फे  श्रीकांत यादव तर अँड. उदयसिंह पाटील समर्थक उमेश महाजन रिंगणात आहेत. तर पॅनेल व्यतिरिक्त दोन अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक भगवान यादव व अविनाश मोहिते समर्थक महेश यादव सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAtul Bhosaleअतुल भोसले