शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : भाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:51 IST

काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्देभाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे : प्रकाश जावडेकर बँकांची कर्जे बुडविणाऱ्यांच्या विदेशातील मालमत्ता जप्त करत असल्याचे स्पष्टीकरण

सातारा : काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.मंत्री जावडेकर म्हणाले, राज्यातील २७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये २०० ग्रामपंचायती आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे लाट केवळ २०१४ ची नव्हती, तर गेल्या चारही वर्षात सर्व निवडणुकांत भाजपची वाढ झाली आहे.सर्वसामान्य जनतेला सुशासन हवे आहे. जातीपातीच्या राजकारणाला लोक बळी पडत नाहीत. तसेच खोटेनाटे प्रचार करून लोक मते देत नाहीत, हे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांची लोकांच्यातील मान्यता संपुष्टात येत आहे.भाजप विरोधकांना कोणताही मुद्दा हाताशी मिळत नसल्याने नसलेले मुद्दे चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांपासून सामान्य जनतेपर्यंत मोदींच्या विकास योजनांचा फायदा होत असल्याने लोक आमच्यासोबतआहेत. राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील लोकच आता आम्ही मोदींच्या बरोबर असल्याचे सांगत आहेत, असेही ते म्हणाले.दरम्यान, बँकांची कर्जे बुडविणाऱ्या कर्जदारांच्या विदेशातील मिळकतीही ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. बुडित खात्यातील कर्जे सरकारने माफ केलेली नाहीत. केवळ बँकांचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कर्जे थकीत कर्जदारांकडून कुठल्याही परिस्थितीत वसूल केली जातील, असेही मंत्री जावडेकर यांनी सांगीतले.साताऱ्यात भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी असल्याचा दावासातारा जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकांत भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, असा दावा मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला. लोक सुशासनाला मते देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगलीministerमंत्री