भाजप जिल्हाध्यक्षांचे नावच मतदार यादीत नाही

By Admin | Updated: April 7, 2015 01:12 IST2015-04-07T00:13:34+5:302015-04-07T01:12:37+5:30

गृहनिर्माण मतदारसंघ : भरत पाटील यांना उमेदवारी दाखल करता आला नाही

BJP District President's name is not in the voter list | भाजप जिल्हाध्यक्षांचे नावच मतदार यादीत नाही

भाजप जिल्हाध्यक्षांचे नावच मतदार यादीत नाही

कुडाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सत्तेवर आलेले भाजप-सेना देखील स्वतंत्र पॅनेल उभे करणार, अशी राजकीय चर्चा होती. मात्र, सोमवारी गृहनिर्माण पाणीपुरवठा गटातून उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांना मतदारयादीत नाव समाविष्ट नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षांच्या उमेदवारी अर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत पंचवार्षिक निवडणुकीत गृहनिर्माण-पाणीपुरवठा गटातून खासदार उदयनराजे भोसले व कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. तर यावेळी राज्यात सत्तेत आलेल्या भाजपने निवडणुकीची तयारी केली आहे. त्यादृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी सोमवारी गृहनिर्माण पाणीपुरवठा गटातून सातारा जिल्हा परिषद सेवकांची मालकी गृहनिर्माण सहकारी संस्था मलकापूर या सोसायटीतून जिल्हा बँकेला मतदार म्हणून वेळेत ठराव पाठविला होता. तर ही सोसायटी १९७७ पासून जिल्हा बँकेची सभासद असतानाही नेमके या सोसायटीचे मतदार यादीतून मतदार म्हणून नाव काढले गेल्याने अ‍ॅड. भरत पाटील यांना सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.अ‍ॅड. भरत पाटील यांच्याच उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भाजप-सेनेची जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नेमकी कोणती भूमिका राहणार? जिल्हाध्यक्ष आपल्या मतदान हक्कासाठी काय करणार? याचीही उत्सुकता राहणार आहे. ’ सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

मुदतीत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा ठराव पाठवूनही मतदार यादीत नाव समाविष्ट का नाही झाले. यासाठी गृहनिर्माण गटातील मतदार यादीची संपूर्ण चौकशी व्हावी व मला मतदानाचा अधिकार मिळावा. तसेच यासंदर्भात मी कायदेशीर मार्गाने जाणार आहे.
- अ‍ॅड. भरत पाटील

Web Title: BJP District President's name is not in the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.