क्रांतिविरांची जन्मभूमी देशासाठी प्रेरणास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:38+5:302021-09-12T04:44:38+5:30
वाई : ‘किसनवीर आबांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची धगधगती ज्वाला प्रज्वलित ठेवली आणि प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांशी संघर्ष केला. स्वातंत्र्य ...

क्रांतिविरांची जन्मभूमी देशासाठी प्रेरणास्थान
वाई : ‘किसनवीर आबांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची धगधगती ज्वाला प्रज्वलित ठेवली आणि प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांशी संघर्ष केला. स्वातंत्र्य उत्तर काळातही भारत निर्माणच्या कामात सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सक्षम करणारी आर्थिक, शैक्षणिक शक्तिस्थाने उभारली. अशा क्रांतिविरांची जन्मभूमी ही सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे,’ असे उद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काढले.
कवठे (ता. वाई) येथे हुतात्मा दिनाचे औचित्य साधत भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे तसेच इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पटोले म्हणाले, ‘सद्य स्थितीमध्ये केंद्रातील भाजप सरकार आणि ब्रिटिश शासन यामध्ये विशेष फरक नाही.’ देशभक्त किसन वीर आबांच्या विचारांचा आणि कार्याचा दाखला देत, समकालीन राजकीय स्थितीबाबत मते व्यक्त केली. यावेळी विराज शिंदे यांनी ‘देश उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान’ याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल, जिजाबा पवार, वाई तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र भिलारे, वाई तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कल्याण पिसाळ, प्रमोद अनपट, कुणाल शिंदे, शाहजी पिसाळ, सचिन वायदंडे, वाई विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल डेरे, सरपंच बाळासाहेब वीर, सुधाकर डेरे, किरण पोळ, पपू लोखंडे, सदाशिव ससाणे, रणजित खुडे, अजित डेरे आदी उपस्थित होते.