शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पक्षी संवर्धन ही लोकचळवळ बनावी : शेखर चरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 5:15 PM

‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देपक्षीमित्र संमेलनाचे कºहाडला थाटात उद्घाटनशहरांमध्ये पक्षी संवर्धनासाठी शहर पक्षी निवडणूक हा उपक्रमही संघटनेने आयोजित केला होता. 

कºहाड : ‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे. प्रचार आणि प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. लोकसहभाग वाढवावा. पक्षी संवर्धन ही लोकचळवळ बनावी,’ असे मत सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले. 

येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी पक्षीमित्र संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष किशोर रिटे, डॉ. गिरीश जठार, डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष दत्ताजी उगावकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या पृथ्वी आणि वृक्षाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. 

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर म्हणाले, ‘पक्ष्यांविषयीची संघटना व संमेलने देशात फक्त महाराष्ट्रामध्येच होतात. महाराष्ट्रात ही संघटना कार्यरत आहे. आजपर्यंत राज्याच्या पाच विभागांत अशी संमेलने झाली आहेत आणि ही संमेलने शासकीय मदतीशिवाय होतात. पक्षी संवर्धनासाठी संघटनेकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. ५ ते १२ नोव्हेंबर यादरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीपासून पक्ष्यांच्या संवर्धनाची प्रेरणा देण्यासाठी पक्षीमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. या संघटनेमार्फत शेतकरी पक्षीमित्र मेळावा हा अनोखा उपक्रमही सुरू आहे. शहरांमध्ये पक्षी संवर्धनासाठी शहर पक्षी निवडणूक हा उपक्रमही संघटनेने आयोजित केला होता. 

दरम्यान, यावेळी सतीश उपळावीकर या चित्रकाराने देशातील सर्व राज्यातील प्रमुख राज्यपक्ष्यांचे रेखाटलेल्या पेंटिंगचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याबरोबरच पक्ष्यांविषयीच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. वर्धा ते कºहाड असा साडेआठशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून पक्षी वाचविण्याचा संदेश देत आलेले किशोर वानखेडे आणि दिलीप वीरकर यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कºहाडला पक्षी अध्ययन केंद्र व्हावेपश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला आहे. या घाटात हजारो जातींचे पक्षी पाहायला मिळतात. या पक्ष्यांचा अभ्यास होण्यासाठी आणि पक्षी संवर्धनासाठी कºहाडला पक्षी अध्ययन केंद्र व्हावे, असा ठराव या संमेलनात व्हावा, अशी अपेक्षा सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच त्या अध्ययन केंद्रासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य