शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘अजिंक्यतारा’चे एफआरपीनुसार बिल अदा

By admin | Updated: January 29, 2015 00:08 IST

शिवेंद्रसिंहराजे : साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी

सातारा : ‘अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीनुसार २ हजार ३४६ रुपये ऊसदर जाहीर केला होता. साखरेचे दर उतरल्याने कारखाना एकरकमी बिल अदा करू शकणार नसल्याचे कारखान्याच्या संचालक मंडळाने गळीत हंगाम चालू होण्यापूर्वीच सांगितले होते. पहिल्या हप्त्यात १८०० रुपये अदा करण्यात आले होते. उर्वरित ५४६ रुपये प्रती मे. टन रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. कायद्यानुसार एफआरपीप्रमाणे कारखान्याने ऊसदर दिला आहे. कोणतेही शासकीय अनुदान, पॅकेज न घेता, जिल्हा बँक अथवा इतर कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने स्वउत्पन्नावर एफआरपीनुसार उसाचे बिल अदा केले आहे,’ अशी माहिती कारखान्याचे तज्ज्ञ संचालक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.दरम्यान, साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी एकहाती सत्ता असलेल्या केंद्र शासनाने ठोस भूमिका घेतल्यास ऊसदराचा तिढा कायमचा सुटेल. त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना दिलासा द्यावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, साखरेचे दर उतरल्याने एफआरपीनुसार दर देणे साखर कारखान्यांना अशक्य झाले होते. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एफआरपीनुसार दर देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी मंडळाने २,३४६ रुपये प्रतिटन ऊसदर देणार असल्याचे जाहीर केले. तसेच कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता ऊस बिल एकरकमी देणे शक्य नसल्याने पहिला हप्ता १८०० रुपये व उर्वरित रक्कम दुसऱ्या हप्त्यात देण्याचेही संचालक मंडळाने जाहीर केले होते. कारखान्याकडे ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता नियमानुसार अदा करण्यात आला तर, उर्वरित ५४६ रुपये रक्कमही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. कारखान्याने कोणतेही पॅकेज न घेता, सरकारची अथवा जिल्हा बँक व इतर कोणत्याही संस्थेची मदत न घेता, साखर व अल्कोहोल विक्री, कोजन प्लँट या माध्यमातून स्वउत्पन्नातून एफआरपीनुसार उसाचे बिल अदा केले आहे. नोव्हेंबर अखेर ६९४०२.३९६ मे. टन ऊस गाळप केले. ५४६ प्रती मे. टन याप्रमाणे कारखान्याने ३ कोटी ७८ लाख ९३ हजार ७०९ रुपये केन पेमेंट शेतकऱ्यांना अदा केले आहे. दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसदराचा तिढा निर्माण होत असतो. ऊसदरासाठी कायदा आहे, मात्र साखरेच्या स्थिर राहण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. बाजारपेठेत साखरेचे दर गडगडले की, एफआरपीनुसार ऊसदर देणे जिकिरीचे होते. (प्रतिनिधी) कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर मिळावा, हीच इच्छा संचालक मंडळाची होती. कोणाच्याही दबावाखाली कारखान्याने हा निर्णय घेतला नव्हता. शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देता आला, याबद्दल आम्ही समाधानी आहोत.-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदारपरदेशी कंपन्यांसाठी साखर उद्योग का?घरगुती वापरासाठी किती साखर लागते? साखरेचा वापर होणाऱ्या यादीत घरगुती साखर वापरणाऱ्या ग्राहकांचा चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर कोकाकोला, पेप्सी या परदेशी कंपन्यांचा नंबर लागतो. मग या परदेशी कंपन्या गलेलठ्ठ करण्यासाठी कमी दराने साखर पुरवली जाते का? अशा कंपन्यांना जगविण्यासाठी साखर उद्योग निर्माण केला आहे का? असा परखड सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे.