बिल थकवतो आम्ही; भरा तुम्ही

By Admin | Updated: August 28, 2016 23:58 IST2016-08-28T23:58:24+5:302016-08-28T23:58:24+5:30

संजय सुर्वे : राष्ट्रवादीचा फंडा असल्याची टीका

The bill exhausts us; Fill you | बिल थकवतो आम्ही; भरा तुम्ही

बिल थकवतो आम्ही; भरा तुम्ही

मेढा : मेढा प्रादेशिक पाणी योजनेचे बिल थकवतो आम्ही अन् पैसे भरा तुम्ही, हा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फंडा म्हणजे चोर तो चोर अन् वर शिरजोर, असा प्रकार आहे,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जावळी तालुका प्रमुख संजय सुर्वे यांनी केली.
मेढा प्रादेशिक पाणी योजनेचे १९ लाखांचे थकित बिल शिवसेना भाजपाने भरावे, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सचिन करंजेकर, संजय सपकाळ, सचिन जवळ, प्रवीण पवार, अरुण जवळे, भाजपाचे विठ्ठल देशपांडे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय पवार-मेढेकर आदी उपस्थित होते.
सुर्वे म्हणाले, ‘मेढा प्रादेशिक नळ पाणी योजनेचे सुमारे १९ लाखांचे वीजबिल थकित झाल्याने गेल्या २० दिवसांपासून वीजपुरवठा बंद असून, आजही मेढा शहराचा काही भागांमध्ये पाणी सुरू नाही. या पाणीपुरवठा समितीने लाखोंचा भ्रष्टाचार केला आहे. ही समिती नोंदणीकृत नाही. तरीही या योजनेला शासनाकडून अनुदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The bill exhausts us; Fill you