पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगमधूनच दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:51+5:302021-02-05T09:10:51+5:30
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल तात्याबा चव्हाण (वय ५०, रा. वेळेकामथी, ता. सातारा) यांनी त्यांच्या दुचाकी चोरीची ...

पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगमधूनच दुचाकी चोरी
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल तात्याबा चव्हाण (वय ५०, रा. वेळेकामथी, ता. सातारा) यांनी त्यांच्या दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनिल चव्हाण यांनी बुधवार, दि. २० रोजी सायंकाळी आठ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच ११ - एजे ०२०७) लावली होती. मात्र, गुरुवार, दि. २१ रोजी सकाळी आठ वाजता पार्क केलेल्या ठिकाणी त्यांना दुचाकी आढळून आली नाही. यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही. याबाबतची तक्रारी त्यांनी शनिवारी, दि. २३ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.