मायक्रो फायनान्स पॉलिसीच्या नावाखाली मोठी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:13+5:302021-03-20T04:39:13+5:30
सातारा : लाईफ लाईन मायक्रो फायनान्स कंपनी व एकता पॉलिसी बजार कंपनी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण व युवकांना ...

मायक्रो फायनान्स पॉलिसीच्या नावाखाली मोठी फसवणूक
सातारा : लाईफ लाईन मायक्रो फायनान्स कंपनी व एकता पॉलिसी बजार कंपनी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण व युवकांना रोजगार, उद्योग, व्यवसायासाठी कर्जपुरवठा करतो सांगत व्यवसाय संरक्षण विम्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा आरोप प्रहार अपंग क्रांती आंदोलनतर्फे अमोल कारंडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
या निवेदनानुसार, संबंधित कंपनीने युवकांना रोजगार देण्याचा बनाव करून त्यांच्याकडून आगाऊ रक्कम बँक खात्यावरती वर्ग करून घेतली आहे. तसेच त्यांना लोन विमा पॉलिसी प्रमाणपत्र देण्यात आले परंतु प्रत्यक्षात त्यांना कर्ज प्रकरणाची रक्कम हातात मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या युवकांनी प्रहार संघटनेचा आधार घेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
एकता जेट लाईट शाखा, आसनगाव, मुंबई-ठाणे या खात्यांवर बेरोजगारांनी पैसे वर्ग केले. या सर्व प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा व कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.