सायकलवरून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास
By Admin | Updated: December 19, 2014 00:30 IST2014-12-18T21:15:11+5:302014-12-19T00:30:20+5:30
कऱ्हाड येथून काठमांडूला रवाना झाले.

सायकलवरून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास
कऱ्हाड : येथील माजी उपनगराध्यक्ष दीपक बेलवलकर व त्यांचे आठ सहकारी सायकलवरून कऱ्हाड येथून काठमांडूला रवाना झाले.
या प्रवासात ते कऱ्हाड, पुणे, शिर्डी, इंदोर, भोपाळ, सागर, फोंडा, अलाहाबाद, गोरखपूर, सोनाली बॉर्डर मार्गे काठमांडू-नेपाळला जाणार आहेत. हा प्रवास १५ दिवसांचा असून २ हजार ३०० किलोमीटर इतका आहे. या टीमने यापूर्वी कऱ्हाड ते लेहलडाख व कऱ्हाड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे़ यावर्षीच त्यांनी पूर्वांचलपर्यंतचा १४ हजार किलोमीटरचा बुलेट प्रवास केला आहे़ सायकल प्रवासात त्यांच्यासोबत सतीश पाटील, विनोद पुजारी, रविराज जाधव, प्रकाश पवार, प्रशांत डोंगरे, रमाकांत गुरसाळे, प्रकाश घाटगे हे सहकारी सहभागी आहेत. (प्रतिनिधी)