वरकुटे मलवडीत भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:14+5:302021-02-08T04:34:14+5:30
वाई : माण तालुक्याच्या पूर्वेकडील सात गावांतील शेतकरी व पशुपालकांच्या जनावरांचे आरोग्य अबाधित ठेवून त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत ...

वरकुटे मलवडीत भूमिपूजन
वाई : माण तालुक्याच्या पूर्वेकडील सात गावांतील शेतकरी व पशुपालकांच्या जनावरांचे आरोग्य अबाधित ठेवून त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरकुटे-मलवडी येथे उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्याचा भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई यांच्याहस्ते नुकताच झाला.
याप्रसंगी सरपंच बाळकृष्ण जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित भांगे, माजी सरपंच जालिंदर खरात, जयसिंग नरळे, खंडेराव जगताप, डॉ. आनंद खरात, सचिन होनमाने, परीक्षित पिसे, ग्रामपंंचायत सदस्या वंंदना यादव, सुनीता मंडले, आरोग्य सेविका लतिका यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, शेनवडी, जांभुळणी, काळचौंडी या सात गावातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची गरज आणि अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन सुवर्णा देसाई यांनी प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.