गोवारे येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:07+5:302021-04-08T04:39:07+5:30

कऱ्हाड : गोवारे (ता. कऱ्हाड) येथे दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य ...

Bhumipujan of road works at Goware | गोवारे येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

गोवारे येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

कऱ्हाड :

गोवारे (ता. कऱ्हाड) येथे दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित देशमुख, अमोल देशमुख, संदीप पाटील, अजित देसाई, अरुण सावंत, अधिक पाटील, सागर भोसले, विलास सत्रे, दिलीप पाटील, तुकाराम सत्रे, लालासाहेब पाटील, आनंदराव पाटील, अशोक माने, धोंडीराम लादे, भीमराव लादे, अंकुश माने, सुहास पाटील, महेश तोगे, रोहित पाटील, भरत शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच गावातील प्रमुख प्रश्न मांडून त्यांच्या सोडवणुकीची अपेक्षा व्यक्त केली. सागर शिवदास यांनी शक्य तितका निधी देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Bhumipujan of road works at Goware