पाचवडमळा शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:19+5:302021-01-24T04:19:19+5:30
यावेळी सरपंच कल्पना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, धोंडीराम मोरे, संभाजी मदने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनुराधा मोरे, उपाध्यक्ष ...

पाचवडमळा शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन
यावेळी सरपंच कल्पना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, धोंडीराम मोरे, संभाजी मदने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनुराधा मोरे, उपाध्यक्ष सयाजी मोरे, जगन्नाथ मोरे, भरत पाटील, मनिषा माने, प्रतिभा मदने यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कापील ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्याकडे पाचवडमळा शाळेच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. कोरोना काळात निधीची कमतरता असतानाही लोकप्रतिनिधींनी विशेष बाब म्हणून वर्गखोलीला मंजुरी देऊन शासनाने निधीचा पहिला धनादेश पारीत केला आहे. या वर्गखोलीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असून उर्वरित शाळेसाठी लवकरच निधी मंजूर होईल, असा विश्वास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे.
फोटो : २३केआरडी०३
कॅप्शन : पाचवडमळा-कापील, ता. कऱ्हाड येथे शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच कल्पना गायकवाड, नितीन ढापरे, धोंडीराम मोरे, संभाजी मदने आदी उपस्थित होते.