कोपर्डे हवेली येथे बंदिस्त गटाराचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:51+5:302021-08-18T04:45:51+5:30
कोपर्डे हवेली : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या निधीतून आरसीसी बंदिस्त ...

कोपर्डे हवेली येथे बंदिस्त गटाराचे भूमिपूजन
कोपर्डे हवेली : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या निधीतून आरसीसी बंदिस्त गटाराचे भूमिपूजन कोपर्डे हवेली येथे करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष दादासाहेब चव्हाण, सिद्धेश्वर विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी चव्हाण, भरत चव्हाण, विद्याधर चव्हाण, विवेक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, डी.एस. काशिद, रघुनाथ खरात, शोभा चव्हाण, अंजनी चव्हाण, वंदना लोहार, शरद चव्हाण, जयवंत साळवे, अक्षय चव्हाण, युवराज चव्हाण, शरद पाटील, अलंकार चव्हाण, अशोक साळवे, बापू कारभारी उपस्थित होते.
प्रभाग दोनमध्ये दादासाहेब चव्हाण यांच्या घरापासून ते पाणी फिल्ट्रेशन प्लांटपर्यंत आरसीसी बंदिस्त गटार बांधण्यात येणार असल्याने पावसाळ्यातील पाणी रस्त्यावर येणार नाही. पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर यामधून जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या निधीतून हे काम होत आहे.