भोसले जोमात; चव्हाणांवर चिंतनाची वेळ : कºहाड तालुका ग्रामपंचायत निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 22:56 IST2018-03-02T22:56:53+5:302018-03-02T22:56:53+5:30

भोसले जोमात; चव्हाणांवर चिंतनाची वेळ : कºहाड तालुका ग्रामपंचायत निवडणूक
प्रमोद सुकरे ।
कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल पाहता हा निकाल भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले समर्थकांचा उत्साह वाढविणारा आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यामध्ये त्यांना आलेले यश पाहिले तर ते समाधानकारक असल्याचे दिसते. मात्र, विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला हे निकाल निश्चितच आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. यातून कोण आणि काय बोध घेणार, हे येणारा काळच ठरवेल.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया कºहाड दक्षिण मतदार संघातील राजकीय वातावरण सध्यातरी चांगलेच अस्थिर बनले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या दोघांच्यातील काँग्रेसअंतर्गत वाद हे त्यामागचे मुख्य कारण मानले जाते आणि ‘दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ’ या म्हणीचा प्रत्यय येतोय की काय, अशी मतदारसंघाची परिस्थिती आहे.
कºहाड दक्षिणेतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यामध्ये रेठरे बुद्रुक, येणपे, शेळकेवाडी व येवती या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात लोकसंख्येने मोठी असणाºया रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. कारण भाजपचे प्रदेश चिटणीस व पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या गावची ही निवडणूक होती आणि होमपीचवर भोसलेंची काय अवस्था होतेय, याची साºयांनाच उत्सुकता होती.
डॉ. अतुल भोसलेंसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला खरा; पण होमपीचवर त्यांचे पानिपत झाले. कारण त्यांना अठरापैकी एकही जागा जिंकता आली नाही आणि गावात अपेक्षित मतेही घेता आली नाहीत. भोसले गटाला सरासरी ७५ टक्के मते या निवडणुकीत पडलेली दिसतात. याशिवाय उंडाळे खोºयातील येवती ग्रामपंचायतीवरही भोसले गटाने सरपंचपदाचा झेंडा फडकवलाय,ही बाब त्यांच्यादृष्टीने जमेचीच मानावी लागेल.
उंडाळे खोºयातील येणपे व शेवाळेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटांतर्गत झाली. येथे त्यांनीबाजी मारली असली तरी यादोन्ही गावांत भाजपने खाते खोलल्याचीच जास्त चर्चा आहे, हेदेखील महत्त्वाचे. येवतीत भोसले गटाने फडकवलेला सरपंचपदाचा झेंडा आणि येणपे व शेवाळेवाडी गावात उघडलेले खाते भविष्यात उंडाळकरांची डोकेदुखी वाढविणार,हे मात्र नक्की.
पृथ्वीबाबा समर्थक चिंतन करणार का?
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंनी जवळजवळ प्रत्येक गावात पॅनेल उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही मिळाले. बंडखोर उंडाळकरांनी भागातील तिन्ही गावांत पॅनेल उभे करीत दोन ठिकाणी यश मिळवले. राष्ट्रवादीच्या अविनाश मोहितेंनी रेठरेत कठीण परिस्थिती असतानाही पॅनेल उभे केले. मात्र, या सगळ्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचे पॅनेल कोणत्याच ठिकाणी दिसले नाही, हे विशेष. ही बाब चव्हाण गटाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे; पण ते आत्मचिंतन करणार का? हा वेगळा विषय.
राजाभाऊंचा ‘भाव’ दिसलाच नाही
ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. आनंदराव पाटील ऊर्फ राजाभाऊ यांनी काही वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यांना जिल्हा परिषद निवडणूकही त्यांनी त्या चिन्हावर लढवली. मात्र, स्वत:च्या मतदारसंघात एकाही गावात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे राहिल्याचे दिसले नाही. त्यामुळे राजाभाऊंचा ‘भाव’ उंडाळे खोºयात दिसलाच नाही, अशी चर्चा आहे.