भरधाव कारची टॅंकरला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:20+5:302021-09-12T04:45:20+5:30

कऱ्हाड : कोल्हापूरकडून भरधाव पुण्याकडे निघालेल्या कारची टँकरला पाठीमागून जोराची धडक बसल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. जखीणवाडी फाटा ...

Bhardhaw car hits tanker; One killed | भरधाव कारची टॅंकरला धडक; एक ठार

भरधाव कारची टॅंकरला धडक; एक ठार

कऱ्हाड : कोल्हापूरकडून भरधाव पुण्याकडे निघालेल्या कारची टँकरला पाठीमागून जोराची धडक बसल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. जखीणवाडी फाटा (ता. कऱ्हाड) येथे झालेल्या अपघातात कारमधील शकील जमाल शेख (वय ४२ रा. स्कायसिटी, धानोर, पुणे) हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरिहर सुथन शिवकुमार (वय २७, रा. नागापट्टीनम, तामिळनाडू) हा कंटेनर घेऊन पुण्याकडे निघाला होता. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कंटेनर कऱ्हाडच्या हद्दीत जखीणवाडी फाट्याजवळ आला. दरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या कारने कंटेनरला जोराची धडक दिली. या धडकेत कारमधील शकील जमाल शेख हे जागीच ठार झाले, तर कारमधील रेश्मा शकील शेख (वय ४१), सफा कागलकर(११), सबा कागलकर (१२), मेहर कागलकर, मोहंमद कागलकर (२) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली असून, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कांबळे तपास करत आहेत.

Web Title: Bhardhaw car hits tanker; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.