कला उत्सवात भक्ती शिर्के राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:54 IST2021-01-02T04:54:24+5:302021-01-02T04:54:24+5:30

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त ...

Bhakti Shirke first in art festival in the state | कला उत्सवात भक्ती शिर्के राज्यात प्रथम

कला उत्सवात भक्ती शिर्के राज्यात प्रथम

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कलाउत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये भक्ती विजयकुमार शिर्के हिने वादन प्रकारातील पारंपरिक पखवाज वादन स्पर्धेत जिल्हास्तर ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्या यशाच्या जोरावर १४ डिसेंबर रोजी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान तिला मिळाला. त्या स्पर्धेत उत्कृष्ट पखवाज वादनाने तिने आपली छाप टाकली. प्रतिस्पर्धी स्पर्धकांवर मात करत तिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

भक्ती ही पाटण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयकुमार शिर्के यांची कन्या आहे. राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाच्या जोरावर भक्ती आता देशपातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

फोटो : ०१भक्ती शिर्के

Web Title: Bhakti Shirke first in art festival in the state