व्याजवाडीत भरदिवसा सव्वालाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 12:50 IST2017-08-09T12:50:04+5:302017-08-09T12:50:07+5:30

वाई : व्याजवाडी, ता़ वाई येथे अज्ञात चोरट्याने राजेंद्र साहेबराव पिसाळ यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा ही चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पिसाळ यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे़

Bhabhiwadi Savvwalkhachi burglary in interest | व्याजवाडीत भरदिवसा सव्वालाखाची घरफोडी

व्याजवाडीत भरदिवसा सव्वालाखाची घरफोडी

वाई : व्याजवाडी, ता़ वाई येथे अज्ञात चोरट्याने राजेंद्र साहेबराव पिसाळ यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा ही चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पिसाळ यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे़

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, राजेंद्र पिसाळ यांचे घर व्याजवाडी (खांडे वस्ती) येथे आहे. मंगळवारी दुपारी पावणे एक वाजता प्रकृती बिघडल्याने राजेंद्र पिसाळ हे वस्तीवरून व्याजवाडी येथे उपचारासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून एक लाख सत्तावीस हजार दोनशे रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला़

यामध्ये साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र, अडीच तोळ्यांचा राणीहार, तीन ग्रॅमची अंगठी, चेन आदी दागिन्यांचा समावेश आहे. पिसाळ हे दुपारी सव्वा एक वाजता घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक पी़ एस. कदम हे अधिक तपास करीत आहेत़

Web Title: Bhabhiwadi Savvwalkhachi burglary in interest