बर्ड फ्लूबाबत सावधानता बाळगा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:54+5:302021-01-08T06:08:54+5:30

सातारा : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात उत्तरेकडे बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सातारा जिल्ह्यातही स्थलांतरित पक्ष्यांमुळे ...

Beware of bird flu: Collector | बर्ड फ्लूबाबत सावधानता बाळगा : जिल्हाधिकारी

बर्ड फ्लूबाबत सावधानता बाळगा : जिल्हाधिकारी

सातारा : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात उत्तरेकडे बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सातारा जिल्ह्यातही स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे पोल्ट्री चालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे.

ते म्हणाले, वन विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा सहभाग घेऊन बर्ड फ्लू रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये हा आजार आढळून आला होता. मायणी तलावाकडे स्थलांतरित पक्षी येत असतात.

लोकांना आवाहन आहे की, फार मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत असेल तर पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, आठवडी बाजार, कत्तलखाने काळजी घेत आहे. चांगल्यारितीने तोंड देत आहोत. पोल्ट्रीचे मार्केट येथे लक्ष्य आहे. सध्या घाबरून जाण्याची गरज नाही. असा प्रसंग दिसला तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कळवा. रोग पसरु नये, यासाठी शासनाकडून ४ जानेवारीस मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत.

Web Title: Beware of bird flu: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.