राजगड किल्ल्याची बांधणी ठरली सर्वोत्कृष्ट

By Admin | Updated: November 17, 2015 00:04 IST2015-11-16T23:05:50+5:302015-11-17T00:04:06+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : ‘लोकमत बालविकास मंच व कराड अर्बन स्पोर्टस्’ तर्फे किल्ला स्पर्धांचे आयोजन

The best way to build Rajgad fort is | राजगड किल्ल्याची बांधणी ठरली सर्वोत्कृष्ट

राजगड किल्ल्याची बांधणी ठरली सर्वोत्कृष्ट

कऱ्हाड : ‘लोकमत बालविकास मंच व कराड अर्बन स्पोर्टस् क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य किल्ला स्पर्धेत चिमुकल्यांनी बांधलेल्या राजगडची बांधणी सर्वोत्कृष्ट ठरली. ओम सचिन मुंढेकर या गटाने राजगडची बांधणी केली होती. त्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सलग आठ दिवस येथील एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर किल्ला स्पर्धा सुरू होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक प्रयत्नातून बांधलेले राजगड, सजजनगड, परोळा, सिंधुदुर्ग असे अनेक अवघड किल्ले येथे चिमुकल्यांनी उभारले होते. या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी कऱ्हाड शहर व परिसरातील हजारो लोकांनी उपस्थिती लावली व छोट्यांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. ‘लोकमत बाल विकास मंच व कराड अर्बन स्पोर्टस् क्लब’ यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून दरवर्षी या स्पर्धा घ्याव्यात.
कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरव म्हणाले, ‘किल्ला स्पर्धेमुळे मुलांमध्ये क्रिएटीव्हीटी निर्माण झाली आहे. मुलांनी मातीमध्ये खेळणे गरजेचे आहे. आजची पिढी फक्त गेमवर खेळत बसते. आजच्या या स्पर्धेमुळे मुलांना मातीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पुढील वर्षी बँकेच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त किल्ला स्पर्धेचे आयोजन करुन ज्या मुलांना जो किल्ला तयार करायचा आहे, त्यांना प्रत्यक्षरीत्या त्या किल्ल्याची भेट दिली जाईल. यामुळे प्रत्यक्षरीत्या तो किल्ला कसा आहे, याची मुलांना माहिती मिळेल.’
मकरंद महाजन म्हणाले, ‘शिवाजी महाराजांनी जे-जे किल्ले बांधले वा ताब्यात घेतले, त्यांना त्या-त्या प्रसंगावरून व पराक्रमावरून नावे ठेवण्यात आली; परंतु त्याला आकार व उकार शिवरायांनी दिला. आजच्या अभियत्यांनी बांधलेले पूल लगेच पडतात; परंतु शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी सुमारे ३५0 वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले आजही तग धरून आहेत यावरून त्यावेळचे अभियंते प्रगत होते,’ असे म्हणावे लागेल. ‘लोकमत बालविकास मंच व कराड अर्बन स्पोर्टस् क्लब’ यांनी आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला असून, इतिहासाची पुनरावृत्ती होण्यास मदत झाली आहे.’
दिलीप चिंचकर यांनी प्रास्ताविक केले. जगदीश त्रिवेदी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

सिंधुदुर्गची बांधणी ठरली द्वितीय
शालेय गटासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्रेयश प्रशांत मोहिते या गटाने मिळविला. त्यांनी सिंधुदुर्गची बांधणी केली होती. तर चिन्मय प्रसाद यादव या गटाने परोळा गटाची बांधणी करून तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, विभागप्रमुख सुनील कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे जॉइंट सेक्रेटरी मकरंद महाजन, कराड अर्बन स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, सचिव जगदीश त्रिवेदी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक मिळवलेल्या राजगडची बांधणी करण्यासाठी गटप्रमुख ओम मुंढेकर यांना शिवम मुंढेकर, सारंग मुंढेकर, कृष्ण मुढेंकर, गौरव मुंढेकर, पुष्पक तेली यांनी साह्य केले. द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सज्जनगड गडाची बांधणी करण्यासाठी गटप्रमुख श्रेयश मोहिते यांना हर्षल जोशी, प्रेम महामुनी, राज मेहरवाडे, तेजस जोशी यांनी साह्य केले. तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या परोळा गडाची बांधणी करण्यासाठी गटप्रमुख चिन्मय यादव यांना ह्षीकेश पाटील, सोहम आठले, रोहन तडक यांनी साह्य केले.

Web Title: The best way to build Rajgad fort is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.