शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीर पसार, १५ लाखांना गंडा; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:28 IST

त्यामुळे त्याच्यावर बसला होता विश्वास

सातारा : येथील सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेडणे बनविण्यासाठी दिलेली १५ लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागिरांनी गावी पलायन केले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.मुस्तकीन बंगाली (रा. डफर चाैक, लाहाट, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत सराफ व्यावसायिक दिनेश दत्तात्रय देशमुख (वय ४४, रा. बसाप्पा पेठ, करंजे सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, बंगाली कारागीर मुस्तकीन हा सध्या कोरेगाव येथे राहत होता. तो साताऱ्यात येऊन दागिने बनविण्यासाठी घेऊन परत कोरेगावला जायचा. त्यानंतर तयार झालेले दागिने परत आणायचा. गेल्या दोन वर्षांपासून तो विश्वासाने दागिने आणून देत होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला होता. काही दिवसांपूर्वी १५ तोळ्यांची दोन सोन्याची बिस्किटे त्याच्याकडे वेडणं बनविण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, हे दागिने परत न देता तो अचानक गायब झाला.

तो राहत असलेल्या कोरेगाव येथे जाऊन माहिती घेतली असता त्याच्यासोबत असलेले अन्य सहा कारागीरही पळून गेले असल्याचे त्यांना समजले. अशाच प्रकारे आणखी व्यावसायिकांची फसवणूक झाल्याचेही समोर येत आहे. पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे अधिक तपास करीत आहेत.