वातानुकूलित सुविधा केंद्राचा शेतकर्‍यांना फायदा

By Admin | Updated: May 23, 2014 22:56 IST2014-05-23T22:39:03+5:302014-05-23T22:56:49+5:30

वेदांतिकाराजे भोसले यांची माहिती

Benefits to the farmers of the air conditioned facility | वातानुकूलित सुविधा केंद्राचा शेतकर्‍यांना फायदा

वातानुकूलित सुविधा केंद्राचा शेतकर्‍यांना फायदा

सातारा : शेती उत्पादित मालाच्या साठवणुकीसाठी उपलब्ध असणारी अपुरी साठवणुकीची सुविधा. त्यामुळे होणारे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेमार्फत येथील औद्योगिक वसाहतीमधील संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत उभारण्यात येणार्‍या साडेसात कोटी खर्चाच्या फुले निर्यात सुविधा केंद्रास (कोल्ड स्ट्रोअरेज) राज्य कृषी पणन मंडळाने मंजुरी दिली आहे. या कोल्ड स्टोअरेजला पूरक ठरणार्‍या चार शेतीमाल सुविधा संकलन केंद्रांनाही परवानगी मिळाली आहे. नागठाणे येथे संस्थेमार्फत १ कोटी ३७ लाख खर्चाचे वातानुकूलित यंत्रणेसह शेतीमाल सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. या सुविधा केंद्राचा फायदा होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली. अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेमार्फत नागठाणे येथील मारुती आबाजी साळुंखे यांच्या नाममात्र भाड्याने घेतलेल्या जागेत उभारण्यात येत असलेल्या शेतीमाल सुविधा केंद्राच्या कामाची पाहणी वेदांतिकाराजे यांनी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय घोरपडे, संचालक व कृषिभूषण मनोहर साळुंखे, संचालक दिलीप शेळके, व्यवस्थापक बाळासाहेब निकम, प्रकल्प विकासक विनायक तांबे, अजित साळुंखे आदी उपस्थित होते. वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांचे शेती आणि शेतकर्‍यांशी असणारे नाते घट्ट होते. शेती व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप आले पहिजे व शेतकर्‍याच्या शेतीमालाला बाजारपेठेमध्ये यथायोग्य दर मिळावा या उद्देशाने त्यांनी अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेची स्थापना २००१ साली केली. शेतक-यांच्या आथर््िाक उन्नतीसाठी संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत. शेती मालाचे उत्पादन हे नेहमीच चालू असते; मात्र याच शेती मालाला शाश्वत दर मिळेल, याची कोणत्याही प्रकारची खात्री नसते. अशावेळी शेती उत्पादित माल वातानुकूलित यंत्रणेत साठविता यावा, यासाठीच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखली संस्थेने सातारा औद्योगिक वसाहतीमधील स्वमालकीच्या जागेत कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे. मुख्य प्रकल्पासाठी शासनाने साडेसात कोटी तर पूरक चार सुविधा केंद्रासाठी प्रत्येकी १ कोटी ३७ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Benefits to the farmers of the air conditioned facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.