शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या गवंड्याचा कऱ्हाडनजीक खून, डोक्यात कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:58 IST

डोक्यात कोयत्याने वार करून गवंड्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉललगत शनिवारी दुपारी उघडकीस आली. महादेव उसूरकर (वय ३०, रा. माळअंकली-बेळगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.

ठळक मुद्देबेळगावच्या गवंड्याचा कऱ्हाडनजीक खूनडोक्यात कोयत्याने वार : हल्लेखोर पसार, कारण अस्पष्ट

कऱ्हाड : डोक्यात कोयत्याने वार करून गवंड्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉललगत शनिवारी दुपारी उघडकीस आली. महादेव उसूरकर (वय ३०, रा. माळ अंकली-बेळगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील महादेव उसूरकर याच्यासह अन्य काही युवक गवंडी कामासाठी रेठरे बुद्रुक येथील कारखाना परिसरात वास्तव्यास आले आहेत. महादेव हा शेणोली स्टेशन येथे राहण्यास होता. परिसरात गवंडी काम करून मिळालेल्या पैशातून तो उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. त्यानंतर मात्र तो कोणालाच दिसला नाही.दरम्यान, शनिवारी दुपारी शेरे येथील काही महिला भात लावणीसाठी शेतात निघाल्या असताना कॅनॉलजवळ त्यांना युवकाचा मृतदेह दिसला. याबाबतची माहिती त्यांनी पोलीस पाटलाला दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले.

संबंधित युवकाची ओळख पटवली असता संबंधित मृतदेह महादेव उसूरकर याचा असल्याचे समोर आले. डोक्यात कोयता घालून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी एक दुचाकी आढळून आली. संबंधित दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरbelgaonबेळगाव