हजर होण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाईला बदली
By Admin | Updated: January 10, 2017 22:53 IST2017-01-10T22:53:20+5:302017-01-10T22:53:20+5:30
हजर होण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाईला बदली

हजर होण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाईला बदली
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील करवीर विभागीय पोलिस उपअधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाई (जि. सातारा) येथे पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्तीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी दुपारी काढले. त्यांच्या जागी औरंगाबादहून हर्ष पोतदार यांची नियुक्ती केली. मंगळवारी सकाळी सातारा पोलिसांनी पाटील यांचा सत्कार करून निरोपही दिला. ते कोल्हापुरात पदभार स्वीकारण्यासाठी येत असतानाच बदलीचे आदेश पुन्हा आले. त्यांच्या अशा तडकाफडकी बदलीची पोलिस दलात जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यातील ७८ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली होती. त्यामध्ये कोल्हापूर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखा व वेल्फेअरचे पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांचा समावेश होता. पाटील यांची सातारा गृहपोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गेले महिनाभर ते तेथील कामकाज पाहत होते; परंतु दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या आर्इंची प्रकृती तितकीशी बरी नसते, त्यामुळे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बदलीसाठी विनंती त्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनीही सरकारला विनंती केली. त्याची दखल घेवून त्यांची करवीर चे उपअधीक्षक म्हणून बदली झाली. त्यासाठी पदभार घेण्यास ते साताऱ्याहून निघाले परंतू तोपर्यंतच वाटेत असतानाच त्यांच्या नवीन बदलीचे आदेश आले. सातारा पोलिसांनी मंगळवारी सत्कार करून पाटील यांना निरोप दिला. आणि त्याच जिल्ह्यांत पुन्हा त्यांना आता रुजू व्हावे लागणार आहे. अशा पध्दतीने बदली झाल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांच्या आतापर्यंतच्या सेवाकाळात असा कधी अपमान झाला नसल्याची भावना त्यामुळे व्यक्त झाली.