मागण्या मान्य झाल्याने ‘हॉकर्स’ आंदोलन मागे

By Admin | Updated: May 25, 2016 23:24 IST2016-05-25T21:32:01+5:302016-05-25T23:24:18+5:30

कऱ्हाडमधील उपोषणास स्थगिती : संघटना पदाधिकारी, मुख्याधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा

Behind the demands, the 'Hawker' movement back | मागण्या मान्य झाल्याने ‘हॉकर्स’ आंदोलन मागे

मागण्या मान्य झाल्याने ‘हॉकर्स’ आंदोलन मागे

कऱ्हाड : कऱ्हाड पालिका व हॉकर्स संघटना यांच्यामध्ये शहरात ‘अतिक्रमण झोन’ उभारण्याबाबत योग्य निर्णय होत नसल्याच्या कारणाने मंगळवारी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. संघटनेच्या मागण्यांचा विचार करता बुधवारी सकाळी अकरा वाजता पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने व मागण्या मान्य केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणास स्थगिती दिली.
बुधवारी सकाळी अकरा वाजता चारचाकी हातगाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, उपाध्यक्ष सतीश तावरे, तालुकाध्यक्ष जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर आदींनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी चर्चा केली.
चर्चेमध्ये संघटनेच्या मागण्या मान्य करत उपोषण मागे घेण्यास मुख्याधिकारी औंधकर यांनी सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे
घेतले.
दरम्यान, उपोषणस्थळी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, शिवसेनेचे कऱ्हाड दक्षिण तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, रामभाऊ रैनाक, शेखर बर्गे, राहुल कुंभार, नितीन देसाई, हरिबा बल्लाळ, गजानन कुंभार आदींनी भेट दिली. व पाठिंबा दर्शविला.
पालिकेचे अन्न भेसळ निरीक्षक रणजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषणास स्थगिती देण्यात आली. यावेळी हातगाडाधारक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालिकेकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू
केले होते. अखेर उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत
मुख्याधिकारी औंधकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शहरातील चारचाकी हातगाडाधारकांवर पालिकेकडून कारवाई करण्यापूर्वी संघटनेला सांगण्यात यावे, हातगाडाधारकांकडून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर
कारवाई करावी, अशा विषयांवर मुख्याधिकारी औंधकर व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा
झाली.
यावेळी मुख्याधिकारी औंधकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना मान्यता देत त्या अनुषंगाने सूचना केल्या. त्या पाळण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केले.
संघटना पदाधिकारी व पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यात सकारात्मकपणे चर्चा पार पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी उपोषणास स्थगिती दिली. (प्रतिनिधी)

कऱ्हाड येथील हॉकर्स झोनबाबत पालिकेसमोर सुरू केलेल्या उपोषणास संघटनेचे जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर यांनी बुधवारी स्थगिती दिली. यावेळी स्मिता हुलवान, शशिकांत हापसे आदी उपस्थित होते.

Web Title: Behind the demands, the 'Hawker' movement back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.