कोपर्डे हवेली परिसरात भात रोपाच्या लावणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST2021-07-27T04:40:11+5:302021-07-27T04:40:11+5:30
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसरात ऊसाच्या पिकानंतर भात पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या दमदार पाऊस झाल्याने ...

कोपर्डे हवेली परिसरात भात रोपाच्या लावणीला सुरुवात
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसरात ऊसाच्या पिकानंतर भात पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या दमदार पाऊस झाल्याने भात रोपांच्या लावणीला सुरुवात झाल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळत आहे.
भात हे जादा पाण्यावर अवलंबून असणारे पीक असल्याने शेतकरी जिबडाल आणि पाणी साचणाऱ्या क्षेत्रावर हे पीक घेतात. भात उत्पादन घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असून, तुलनेत भाताची लावणी करून उत्पादन घेणारे क्षेत्र जास्त आहे.
या विभागात इंद्रायणी, बासमती वाणाचे उत्पादन जास्त प्रमाणात शेतकरी घेतात. भात लावणीपूर्वी शेतात चिखलणी केली जाते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन तणांचे प्रमाण कमी राहते, शिवाय भाताचे उत्पादनही चांगले मिळते. भात लावणी करताना एका रेषेत रोपांची लावणी होण्यासाठी शेतकरी दोरीचा वापर करतात.
सध्या दमदार पाऊस झाल्याने आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने भात लावणीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे परिसरातील कोपर्डे हवेली, नडशी, शिरवडे, पिंपरी उत्तर कोपर्डे, बनवडी, सैदापूर आदी गावांमधील शेतात भात लावणीला सुरुवात झाल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळत आहे.
फोटो ओळ... : '
२६ कोपर्डे हवेली
पिंपरी (ता. कऱ्हाड) येथील शेतात शेतकरी भाताच्या रोपांची लावणी करत आहेत.