‘उमेद’च्या साथीने आत्मनिर्भर बना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:21+5:302021-09-14T04:45:21+5:30
गोटे (ता. कऱ्हाड) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ...

‘उमेद’च्या साथीने आत्मनिर्भर बना!
गोटे (ता. कऱ्हाड) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बानूबी सय्यद होत्या. पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी वसंतराव मुळे, एस. बी. पोतदार, तालुका अभियान व्यवस्थापक नीलेश पवार, बँक मॅनेजर मोहसीन शिरगुप्पे, उपसरपंच तोफिक आगा, ग्रामविकास अधिकारी रमेश पवार, प्रभाग समन्वयक श्रीकांत कुंभारदरे यांची उपस्थिती होती.
नामदेव पाटील म्हणाले, चूल आणि मूल या मर्यादेत अडकलेल्या महिला उमेद अभियानाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. या महिला सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. प्रगतीचा हा आलेख चढता ठेवत स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या महिलांनी उद्योग व्यवसायांची निर्मिती करण्याकडे पावले टाकावीत. या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून आत्मनिर्भर होतील.
बानुबी सय्यद यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिलांनी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधत जास्तीत- जास्त शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले.
दरम्यान, यावेळी मान्यवरांच्या हस्ते १७ सहाय्यता समूहातील १७० महिलांना कर्ज वाटप करण्यात आले. नीलेश पवार यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत कुंभारदरे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
फोटो : १३केआरडी०२
कॅप्शन : गोटे (ता. कऱ्हाड) येथे पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्याहस्ते सहाय्यता समूहांना कर्ज वाटप करण्यात आले.