शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

साताऱ्यातील या निसर्गसुंदर पर्यटनस्थळांंना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 12:47 IST

साताऱ्यातील या ठिकाणांमुळे आता लोकं भटकंतीसाठी इथल्या ठिकाणांचाची विचार करु लागले आहेत.

ठळक मुद्देसातारा हे साधारणपणे सैनिक शाळा आणि सैनिक गावकऱ्यांसाठी ओळखलं जातं.इथे अनेक पर्यटन स्थळं आहेत , ज्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेता येतो.खर्चाच्या दृष्टीनेही ते इतकं महाग नाहीये म्हणून पर्यटक त्य़ा ठिकाणांना प्राधान्य देतात.

मुंबई : कृष्णा आणि वीणा नदी, सात डोंगररागांच्या मध्ये वसलेला जिल्हा म्हणजे सातारा. मुळात साताऱा जिल्ह्याचं नावच सात अधिक तारा म्हणजेच पर्वत अशा अपभ्रंशाने तयार झालं असल्याचं काहीजण सांगतात. अजिंक्यतारा किल्लाही याच जिल्ह्यातला. कंदी पेढा तुम्ही ऐकलंच असेल. सातारा जिल्ह्यातील कंदी पेढा जगप्रसिद्ध आहे. सगळ्या पर्यटकाचं आवडतं ठिकाण पाचगणी आणि महाबळेश्वर हेसुद्धा सातारा जिल्ह्यातच आहे. निसर्गत:च या जिल्ह्याला फार सौंदर्य आहे. इकडे शांतताही नांदते. किल्ले, डोंगररांगा, नद्या, जुनी मंदिर अशी विविध स्थळं साताऱ्याच्या इतिहासाची साक्ष देतात. 

अंजिक्य किल्ला

सातारा जिल्ह्याच्या अगदी मध्यभागीच हा किल्ला आहे. ३ हजार ३०० फूट उंच असलेल्या अजिंक्य पर्वतावर हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जुनी पाणपोईसुद्धा आहे. यवतेश्वरच्या पर्वतावरुनही तुम्हाला हा अभेद्य किल्ला दिसू शकतो. या किल्ल्यावरच मंगलाई देवीचं मंदिरही आहे. तसंच हनुमान आणि शंकराचंही मंदिर किल्ल्यावर आढळतं. ए‌वढंच नव्हे तर टेलिव्हिजन आणि रेडिओचे टॉवर्सही या किल्ल्यावर आहेत.

भैरवगड 

जंगलाच्या मध्ये लपलेला भैरवगड ३००० फूट उंच आहे. दुर्गादेवी गावात असलेला हा किल्ला महाबळेश्वरच्याच मार्गात आहे. भैरीभवानी, तुळजादेवी आणि वाघजाई या देवींची मंदिरे या गडावर आहेत. त्यामुळे भक्तांची इकडे ये-जा सुरुच असते. अगदी जुन्या पद्धतीचं बांधकाम या मंदिराचं असल्याने अनेक भाविक आणि पर्यटक आवर्जुन भेट देत असतात. २ ते ३ फुटांच्या देवींच्या मूर्ती या मंदिरामध्ये आहेत. 

कोयना अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगल म्हणून या कोयना अभयारण्यकडे पाहिलं जातं. ४६३ किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या या अभयारण्य शिवसागर जलायशयाच्या कडेकडेने वसलेलं आहे. १९८५ साली या जागेला अभयारण्याची मान्यता मिळाली. अनेक प्रकारचे वन्यजीव आपल्याला इकडे सापडतात. साबंर, भेकर आणि पिसोरी हे हरणाचे प्रकार इकडे आहेत तर, माकडं, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर, रानससे, अस्वल, बीबटे आदी हिंस्र प्राणीही इकडे आढळतात. पूर्वी या प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पर्यटक फटाके फोडत असत. मात्र नंतर फटाके फोडण्यास बंदी करण्यात आली. वासोटा, जंगली जयगड, मधुमकरंदगड आदी किल्ले या अभयारण्यात आढळतात. 

महाबळेश्वर

महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखतात. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर ब्रिटिश कालापासून पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. इकडे असलेलं महाबळेश्वराचं देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधलेलं आहे. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडनिंग पॉईंट असे विविध पॉईंट महाबळेश्वरमध्ये आहेत. तसंच वाघाचे पाणी नावाचा मोठा जलाशयही इकडे आहे. इकडे असलेली ५ शिवमंदिरे भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवतात. कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेणणा, सरस्वती, आणि भागीरथी या ७ नद्यांचे उगमस्थान इकडे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रतापगड किल्लाही महाबळेश्वरमध्येच आहे.

मयानी पक्षी अभयारण्य

भारतातील सर्वात महत्त्वाचं पक्षी अभयारण्य म्हणजे मयानी पक्षी अभयारण्या. सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या अगदी मधोमधच हे अभयारण्य आहे. २००५ साली केलेल्या पक्षीगणनेनुसार इकडे ४०० हून अधिक पक्षांच्या जाती आहेत. पक्षीप्रेमी वर्षातून एकदा इकडे भेट देतातच. त्याचप्रमाणे या जागेला राष्ट्रीय दर्जा असल्याने जगभरातील पर्यटक येत असतात. पक्षीप्रेमींसाठीतर हे अभयारण्य स्वर्गापेक्षाही कमी नाही. वाडूज गावात हे अभयारण्य असून अभयारण्याच्या बाजूला वाडूज गावचा बाजारही भरतो. 

वाल्मिकी टेबल  लँण्ड

साताऱ्यातल्या वाल्मिकी मंदिरापासून अवघ्या १ किमी अंतरावर असलेलं वाल्मिकी टेबल लँण्ड समुद्रसपाटीपासून ३२५९ फूट उंचावर आहे. २० किमी पसरेला हा परिसर कोकणात जोडतो. पश्चिमेला चिपळूनशी जोडतो तर दक्षिणेला संगमेश्वर आणि देवरुखला जोडलेला आहे. काळ्या खडकाळ दगडांनी व्यापलेला हा परिसर नजरही पोहोचणार असा अफाट पसरेलेला आहे. इकडून चंडोळी धरण आणि कोयना अभयारण्यही स्पष्ट दिसतं.

श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

सातारा जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेली अनेक किल्ले आहेत. शिवाजी महारांजाच सहवास लाभलेल्या या भूमीत त्यांच्याच नावाने एक वस्तुसंग्रहालयही स्थापन करण्यात आलंय. सतराशे आणि अठराशे शतकातील काळ लोकांना माहित व्हावा याकरता या वस्तुसंग्रहालयाची स्थापन करण्यात आलीय. एक्झीबिशन आर्टिकल आणि मराठा आर्ट गॅलरी अशी दोन विभाग या वस्तुसंग्रहालयात आहेत. जुनी अवजारे, शस्त्रांचं इथे खूप चांगलं कलेक्शन आहे. 

पांचगणी हील स्टेशन

कृष्णा नदीच्या किनारी वसलेलं पांचगणी हे महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर ठिकणांमध्ये गणलं जातं. महाबळेश्वर ते पुणे या रस्त्यावर पाच लहान लहान पर्वतरांगा असल्याने याल ठिकाणाला पांचगणी असं नाव पडलेलं आहे.  डोळ्यांना सुखावतील असे अनेक स सुंदर दृष्य फोटोग्राफर्सना इकडे मिळू शकतील. निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केल्याने जगभरातील पर्यटक इकडे भेट देत असतात. महाबळेश्वर ते पुणे या मार्गावरच हे ठिकाण असल्याने अनेक प्रवासी इकडे येतात आणि शहराचं निसर्गसौंदर्य अनुभवतात. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTravelप्रवासtourismपर्यटन