पळशीत किरकोळ कारणामुळे मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:39+5:302021-09-07T04:47:39+5:30
शिरवळ : पळशी येथे किरकोळ कारणांमधून झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारीवरून शिरवळ पोलीस स्टेशनला दोन्ही गटांतील चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ...

पळशीत किरकोळ कारणामुळे मारहाण
शिरवळ : पळशी येथे किरकोळ कारणांमधून झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारीवरून शिरवळ पोलीस स्टेशनला दोन्ही गटांतील चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. संबंधितांना खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पळशी येथे मनीषा संतोष शिंदे या घरी असताना त्याठिकाणी अनिल शिंदे हे त्याठिकाणी आले. यावेळी घराबाहेरील पत्र्याचे स्क्रू कोणी काढल्याच्या कारणावरून भूषण तुकाराम शिंदे, पोपट नानू शिंदे, शिवाजी नानू शिंदे, विठ्ठल बाळू शिंदे, चंद्रकांत नामदेव शिंदे, रोहिदास महादेव शिंदे, रामदास महादेव शिंदे, कृष्णा जगन्नाथ शिंदे, नंदा तुकाराम शिंदे, रूपाली रोहिदास शिंदे, राधिका रामदास शिंदे (सर्व रा. पळशी) यांनी दमदाटी केली. तसेच मनीषा शिंदे यांच्यासह मुलगी आरोही, सासू वत्सला यांना हाताने मारहाण व शिवीगाळ करून संडासचे तसेच कांद्याचे शेडचे बांधकाम पडून नुकसान केले आहे, अशी फिर्याद मनीषा शिंदे यांनी दिली. यावरून शिरवळ पोलिसांनी अकराजणांविरुद्ध गुन्हा दखल केला.
त्याचप्रमाणे परस्परविरोधी राधिका रामदास शिंदे यांच्या तक्रारीनुसार पळशी हद्दीत खडक शिवारामध्ये १५०३ गटातील माळरान येथे गवत काढत असताना ‘तू येथे गवत काढण्यास का आलीस’ यावर त्यास विरोध केला म्हणून मनीषा संतोष शिंदे, वत्सला महादेव शिंदे यांनी राधिका शिंदे यांचे केस ओढून हाताने मारहाण केली, तर कृष्णा महादेव शिंदे याने विळ्याने डाव्या हाताचे पोटरीवर मारून दुखापत केली आहे, अशी फिर्याद दाखल केली. त्यावरून शिरवळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे तपास करीत आहे.