शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST2021-07-02T04:26:22+5:302021-07-02T04:26:22+5:30
सातारा : जेवण करून रात्री साडेदहा वाजता शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रीतम अनिल चव्हाण (वय १७, रा. सरस्वती बंगला, सदर ...

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या युवकाला मारहाण
सातारा : जेवण करून रात्री साडेदहा वाजता शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रीतम अनिल चव्हाण (वय १७, रा. सरस्वती बंगला, सदर बझार, सातारा) या युवकाला दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ऋषिकेश हेमंत धोत्रे, अक्षय हेमंत धोत्रे (रा. देशमुख काॅलनी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रीतम चव्हाण हा बुधवार, दि. २९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणानंतर शतपावली करण्यास घराबाहेर पडला. सदर बझार परिसरातून तो जात असताना धोत्रे बंधूंनी त्याला अडवले. आम्ही सकाळी तुझ्या गाडीला डॅश मारला, तेव्हा तू आमच्याकडे रागाने का बघितलेस, असे म्हणून त्याला मारहाण केली. तर ऋषिकेश धोत्रे याने प्रीतमच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला फरशी मारली तर पाठीवर दगड मारून जखमी केले. या प्रकारानंतर प्रीतम याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी धोत्रे बंधूंवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला.