लहान मुलांच्या भांडणातून महिलेस मारहाण; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:18+5:302021-02-06T05:15:18+5:30
सातारा : लहान मुलांच्या झालेल्या भांडणाच्या रागातून सातारा येथील सहकारनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेस तिघांनी मारहाण आणि शिवीगाळ करून ...

लहान मुलांच्या भांडणातून महिलेस मारहाण; तिघांवर गुन्हा
सातारा : लहान मुलांच्या झालेल्या भांडणाच्या रागातून सातारा येथील सहकारनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेस तिघांनी मारहाण आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरिफा शौकत सय्यद (वय २६, रा. सहकारनगर कॉलनी, सातारा) यांनी तक्रारीत म्हटले आहे, बाळू कोळपे, त्याची आई आणि बहीण आणि स्वत: तक्रारदार शेजारी-शेजारी राहतात. यांच्या लहान मुलांची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून या तिघांनी गुरुवार, दि. ४ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरिफा सय्यद यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरिफा यांनी तिघांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी भेट दिली आणि माहिती घेतली.