कुरवलीत एकाला मारहाण; आठजणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:25+5:302021-09-05T04:44:25+5:30
फलटण : ‘जमीन आम्ही घेतली आहे, इथे वहिवाट करू नका,’ असे म्हणणाऱ्या मुलास व त्याच्या आईस शिवीगाळ करून ही ...

कुरवलीत एकाला मारहाण; आठजणांविरोधात गुन्हा दाखल
फलटण : ‘जमीन आम्ही घेतली आहे, इथे वहिवाट करू नका,’ असे म्हणणाऱ्या मुलास व त्याच्या आईस शिवीगाळ करून ही जागा आमची आहे, आम्ही काहीपण करू, असे म्हणत मुलास कोयत्यासारख्या हत्याराने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आठजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कुरवली बुद्रुक (ता. फलटण) येथे सचिन अंकुश जेडगे (वय २५) व्यवसाय शेती याने विकत घेतलेल्या टिकोळे यांच्या शेतात अनंतकुमार बापू सूळ हा ट्रॅक्टरने वहिवाट करीत होता. त्यामुळे सचिन अंकुश जेडगे व त्याची आई ‘तुम्ही आमच्या जमिनीत वहिवाट करू नका,’ असे म्हणाले असता, अनंतकुमार बापू सूळ, अक्षय युवराज माने, अमोल युवराज माने, पंकज कैलास गुईकर, सोनू रामा पडळकर (सर्व रा. कुरवली बुद्रुक) व इतर तीन ते चार व्यक्तींनी सचिन व त्याच्या आईस शिवीगाळ करून दमदाटी केली व ‘हे आमचे शेत आहे, आम्ही वहिवाट करणार,’ असे म्हणून अक्षय युवराज माने, अमोल युवराज माने, पंकज कैलास गुईकर यांनी हातात असणाऱ्या लाकडी काठीने व कोयत्यासारख्या हत्याराने सचिन जेडगे यांना मारहाण करून उजव्या पायावर मारहाण केले आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार मोहन हंगे करीत आहेत.