दुचाकीवर बसले नाही म्हणून वृद्धाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:23+5:302021-02-05T09:20:23+5:30
सातारा : पंचाहत्तर वर्षीय वृद्ध गाडीवर बसले नाहीत म्हणून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील नेले येथील एकावर ...

दुचाकीवर बसले नाही म्हणून वृद्धाला मारहाण
सातारा : पंचाहत्तर वर्षीय वृद्ध गाडीवर बसले नाहीत म्हणून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील नेले येथील एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शकील निजाम फरास (रा. फरास वस्ती, नेले, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मण राजू जाधव (वय ७५) आणि शकील फरास हे दोघे नेले येथील फरास वस्तीवर राहतात. गुरुवार, दि. २८ रोजी लक्ष्मण जाधव हे शेतीचे कामे करून घरी येत असताना त्यांना शकील फरास याने 'लक्ष्या तू माझ्या गाडीवर बस,' असे म्हटले. यावर लक्ष्मण जाधव यांनी 'मी तुझ्या गाडीवर बसणार नाही,' असे सांगितले. यावर चिडून जाऊन शकील याने लक्ष्मण यांना दारू पिऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याचीही धमकी दिली. तसेच तुझ्या शेतीतील मालमत्तेचे नुकसान करण्याचीही धमकी दिली. या घटनेनंतर लक्ष्मण यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी नेले येथे भेट दिली.