मत न दिल्याच्या कारणावरून वरखडवाडीत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:38+5:302021-01-20T04:38:38+5:30

वाई : येथील वरखडवाडीत एकाला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पार्टीला मतदान न केल्याने घरात घुसून चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करत ...

Beaten up in Varkhadwadi for not voting | मत न दिल्याच्या कारणावरून वरखडवाडीत मारहाण

मत न दिल्याच्या कारणावरून वरखडवाडीत मारहाण

वाई : येथील वरखडवाडीत एकाला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पार्टीला मतदान न केल्याने घरात घुसून चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री साडेसातच्यासुमारास घडली. याप्रकरणी चौघांवर वाई पोलीस ठाण्यात मारहाणीचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील वरखडवाडीच्या ग्रामपंचायतीचे मतमोजणी सोमवारी झाली. त्याचदिवशी सायंकाळी प्रकाश बबन रांजणे हे सायंकाळी साडेसात वाजता टीव्ही पहात बसले होते. त्याचवेळी वैभव बाजीराव साळुंखे, पंकज दामोदर पवार, प्रसाद सर्जेराव साळुंखे, विशाल आनंदराव फणसे (सर्व रा. वरखडवाडी) हे घरात घुसून ‘तू आमच्या पार्टीला का मतदान केले नाहीस,’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. त्यात अश्विनी रांजणे, कृष्णा महादेव रांजणे, शिवाजी महादेव सपकाळ यांना मारहाण झाल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी प्रकाश रांजणे यांनी मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे तपास करत आहेत.

Web Title: Beaten up in Varkhadwadi for not voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.