वादावादी कशाला करता म्हटल्याने बाटलीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:58+5:302021-05-22T04:35:58+5:30
सातारा : कोणाशी वादावादी कशाला करता, असे म्हटल्याच्या कारणावरून एकाला काचेच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ...

वादावादी कशाला करता म्हटल्याने बाटलीने मारहाण
सातारा : कोणाशी वादावादी कशाला करता, असे म्हटल्याच्या कारणावरून एकाला काचेच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना राजलक्ष्मी टॉकीजजवळ घडली. याप्रकरणी फिरोज उस्मान खान (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जाहीर महमद शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि नवाज नुरा खान (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. फिरोज खान यांनी फोनवरून कशाला वादावादी करता, असे म्हटले होते. त्यामुळे संशयितांनी चिडून शिवीगाळ, दमदाटी केली, तसेच फिरोज यांना काचेच्या बाटलीने डोक्यात, हात, तोंडावर मारहाण केली. त्यांचा भाऊ भांडण सोडविण्यास आल्यावर त्यांनाही मारहाण करून दुखापत करण्यात आली.
तक्रारीनंतर सातारा शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सहायक फौजदार ए.आर. जगदाळे हे तपास करीत आहेत.
..............................................................