गाडी नीट चालविण्याचा सल्ला दिल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:39+5:302021-02-05T09:10:39+5:30
सातारा : येथील सदर बझार परिसरात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून एकाला लाथाबुक्क्या तसेच दगडांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना ...

गाडी नीट चालविण्याचा सल्ला दिल्याने मारहाण
सातारा : येथील सदर बझार परिसरात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून एकाला लाथाबुक्क्या तसेच दगडांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
या प्रकरणी अमीर फौजआलम सय्यद (वय ४३, रा. मल्हार पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम चव्हाण, शंतनू यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास अमीर सय्यद हे संजीवनी हॉस्पिटलपासून सदर बझारकडे निघाले होते. त्यावेळी संशयित हे त्यांच्याकडील दुचाकीवरून चुकीच्या बाजूने आल्याने अमीर यांनी योग्य बाजूने जाण्याबाबत सांगितले. त्याचा राग मनात धरून संशयितांनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. महिला पोलीस नाईक झेंडे या अधिक तपास करत आहेत.