सभापती व्हायचे होते; झाल्या आरोपी!
By Admin | Updated: September 18, 2014 23:26 IST2014-09-18T23:16:47+5:302014-09-18T23:26:08+5:30
बोगस जात प्रमाणपत्र : पाटण पंचायत समिती सदस्या सुमन जाधवांवर गुन्हा

सभापती व्हायचे होते; झाल्या आरोपी!
पाटण : नुकत्याच झालेल्या सभापती निवडीत देसाई गटाच्या पंचायत समिती सदस्या सुमन जाधव यांनी ओबीसी (कुणबी) जातीचे बोगस प्रमाणपत्र दाखविल्याबाबत पाटणकर गटाच्या विद्यमान सभापती संगीता गुरव यांनी पाटण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ठकबाजी करून खोटी सही व शिक्क्याचा वापर केल्याप्रकरणी सुमन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पाटणकर गटाचे पंचायत समितीचे सदस्य राजेश पवार यांनी या बनावट जात प्रमाणपत्राचा पाठपुरावा करताना कोल्हापूर येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केला होता.