Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांची जाण असणाऱ्यांच्या पाठीशी राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:07 IST2019-04-20T00:07:45+5:302019-04-20T00:07:59+5:30
दहिवडी/फलटण : ‘आमचा कुलभूषण जाधव तीन वर्षे पाकिस्तानमधील जेलमध्ये आहे. तेव्हा तुमची ५६ इंचांची छाती कुठे गेली,’ अशी टीका ...

Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांची जाण असणाऱ्यांच्या पाठीशी राहा
दहिवडी/फलटण : ‘आमचा कुलभूषण जाधव तीन वर्षे पाकिस्तानमधील जेलमध्ये आहे. तेव्हा तुमची ५६ इंचांची छाती कुठे गेली,’ अशी टीका करतानाच ‘या निवडणुकीत शेतकºयांची जाण असणाºयांच्या पाठीशी राहा,’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
दहिवडी, (ता. माण) येथे माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संजय शिंदे, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार तुकाराम तुपे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, आनंदराव देवकाते, एम. के. भोसले, विवेक देशमुख डॉ. संदीप पोळ, सुरेंद्र गुदगे आदी उपस्थित होते.पवार पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी अकलूजला आले होते. आम्हाला वाटले शेतकºयांना काहीतरी मदत करतील; परंतु शेतीप्रश्नावर ते काहीच बोलले नाहीत. आज शेतीची अवस्था बिकट झालीय. बी-बीयाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. खताचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाला किंमत नाही. या प्रश्नांवर बोलायचे सोडून पंतप्रधान ‘शरद पवार ऊन लोगों के साथ क्यों है?’ असे मला म्हणतात. शेतकºयांच्या प्रश्नासाठी, दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकºयांची जाण असणाºयांच्याच पाठीशी मतदारांनी राहावे.’
रामराजे म्हणाले, ‘माढ्यातील भाजपचे उमेदवार सांगतात मी रामराजे यांचा पुतण्या आहे. कोणी काही बोलले तर त्यावर विश्वास ठेवू नका. या निवडणुकीत चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी राहा.
मुख्यमंत्र्यांनी नागपूरचाच विकास साधला : चव्हाण
‘आज देशात सुप्त लाट आहे; पण जिल्ह्यात गालबोट लागेल, असे कोणीही वागू नये. माझ्या नावाचा कोणी गैरवापर केला तर ते खपवून घेणार नाही. भाजप सरकारने पाच वर्षांत नेमके काय केले, ते सांगावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त नागपूरचा विकास केला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर निवडणुका होणार नाहीत,’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.