सजग होऊन समाजनिर्मितीकडे लक्ष द्यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:25+5:302021-02-05T09:13:25+5:30
येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, खरेदी-विक्री संघाचे ...

सजग होऊन समाजनिर्मितीकडे लक्ष द्यावे!
येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्था सदस्य डॉ. चव्हाण, यज्ञसेन पाटणकर, संजीव चव्हाण, प्रदीप साळवेकर, जगदीश शेंडे, प्राचार्य डॉ. एस.डी. पवार, प्राचार्य विलास पवार उपस्थित होते.
अशोकराव थोरात म्हणाले, देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकांना हक्क व कर्तव्य मिळाली आहेत. याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. मोबाइलच्या जगातून बाहेर येऊन तरुणांनी भरपूर वाचन केले पाहिजे. स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे. देशाचा इतिहास, भूगोल समजून घेतला पाहिजे. व्यवहार ज्ञान महत्त्वाचे आहे. त्याच्या बळावरच जीवनात यश प्राप्त होते.
यावेळी माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व कोरोनायोद्ध्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे समन्वयक प्रा. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी रायफल व मंत्रमुग्ध करणारे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. प्राचार्य पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भरत जाधव यांनी आभार मानले.
फोटो : ०२केआरडी०४
कॅप्शन : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात माजी सैनिकांच्या सत्कारप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांचे भाषण झाले.