रणसिंगवाडीत नवविवाहितेने घेतले पेटवून

By Admin | Updated: June 24, 2017 17:06 IST2017-06-24T17:06:32+5:302017-06-24T17:06:32+5:30

८० टक्के भाजून गंभीर जखमी, साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

In the battle of Ransingwadi, a newly married woman fired | रणसिंगवाडीत नवविवाहितेने घेतले पेटवून

रणसिंगवाडीत नवविवाहितेने घेतले पेटवून


आॅनलाईन लोकमत

सातारा , दि. २४ :खटाव तालुक्यातील रणसिंगवाडीतील महादेवी अंकूश पातेकर (वय २५) या नवविवाहितेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये महादेवी ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून तिच्यावर साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केवळ पंधरा दिवसांपूर्वीच महादेवीचे लग्न झाले आहे. दुपारी राहत्या घरात तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात त्यांनी दाखल केले. कोणत्या कारणातून तीने हा प्रकार केला, याबाबत पोलिसांना माहिती समजली नसून ती जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही, असे पोलिसांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: In the battle of Ransingwadi, a newly married woman fired